अल्पवयीन शालेय विद्यार्थ्याने घेतली गळफास! ; सावंतवाडी शहरातील दुर्दैवी घटना.

सावंतवाडी : शहरातील जुनाबाजार कामत नगर येथे एका अल्पवयीन शालेय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. जतिन उर्फ जय प्रशांत राऊळ (वय १६) असं त्याच नाव असून आत्महत्येमागच नेमक कारण समजू शकलेल नाही. सावंतवाडी पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

मुळ नेमळे-फौजदारवाडी येथील हे कुटुंब शहरात राहत होतं. कामत नगर येथील इमारत रिडेव्हलपमेंटला काढल्याने ही इमारत बंद होती. आज त्याने या खोलीत जात आत्महत्या केली. मागील दरवाजाने आत जात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. सायंकाळपर्यंत घरी न परतल्यान घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी कामत नगर येथील खोली बंद अवस्थेत दिसली. यावेळी खिडकी उघडून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली.

पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या उपस्थितीत पंचनामा करत मृतदेह पुढील सोपस्कारासाठी रूग्णालयात नेण्यात आला. जतिन राऊळ हा हुशार विद्यार्थी होता. तसेच क्रीडा क्षेत्रात देखील तो अग्रेसर होता. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे समजू शकलेले नाही. सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहे. त्याच्या या टोकाच्या पाऊलामुळे राऊळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles