बंगळुरू : विदर्भाच्या पोट्ट्यांचं गेल्या स्पर्धेत चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. तेव्हा विदर्भाला अंतिम सामन्यात कर्नाटक विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे विदर्भाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र पोट्ट्यांनी पराभवामुळे खूचून न जाता जोरदार मुसंडी मारली. विदर्भ क्रिकेट टीमने हर्ष दुबे याच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2025-2026 या मोसमातील अंतिम सामन्यात सौराष्ट्रचा धुव्वा उडवला आहे. विदर्भ यासह विजय हजारे ट्रॉफी चॅम्पियन ठरली आहे. विदर्भाची ही ट्रॉफी जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली आहे.



