सर्वोदयनगरच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित स्नेहसंमेलनाचे नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांना निमंत्रण! ; विविध स्पर्धांसह कलागुणांचे होणार सादरीकरण, महिला संघाचा विशेष पुढाकार.

सावंतवाडी : येथील सर्वोदयनगर रहिवासी संघ, सावंतवाडी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी २०२६ (सोमवार) रोजी सायंकाळी ६. ३० वाजता विशेष प्रजासत्ताक दिन स्नेहसंमेलन तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्षा व प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका यांचा स्नेह सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण आज सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांना देण्यात आले. यावेळी रहिवासी संघाचे अध्यक्ष सुनील राऊळ, महिला अध्यक्षा दिशा कामत, उपाध्यक्ष तथा नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेविका  सुकन्या टोपले, ॲड. प्रा. गणपत शिरोडकर, रहिवासी संघाचे सदस्य गुरुदत्त कामत यांसह अन्य उपस्थित होते.

दरम्यान सर्वोदय नगर रहिवासी संघाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या या देशभक्तीपर सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी हे स्नेहसंमेलन रंगणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ६.३० वाजता दीपप्रज्वलन व प्रजासत्ताक दिन अभिवादनाने होणार असून त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात होईल. सायंकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत प्रजासत्ताक दिन विशेष फॅन्सी ड्रेस/वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रात्री ८.०० ते ९.०० दरम्यान सांस्कृतिक कला-गुणांचे सादरीकरण होईल. त्यानंतर रात्री ९.०० वाजल्यापासून स्नेहभोजन ठेवण्यात आले आहे. सदर संमेलन सर्वोदयनगर गार्डन, भारत गॅस गोडाऊन शेजारी येथे होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक अध्यक्ष सुनील राऊळ, उपाध्यक्ष नगरसेवक अजय गोंदावळे, सचिव मेघना राऊळ, महिला अध्यक्षा दिशा कामत, महिला सचिव शरयू बार्देस्कर व सर्वोदयनगररहिवासी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles