सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली व सांगली जिल्हा थायबॉक्सिंग असोसिएशन सांगलीद्वारा आयोजित राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा 2025- 2026 श्री लक्ष अकॅडमी निवासी सैनिक स्कूल मणेराजुरी या ठिकाणी दिनांक, 19 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आल्या. यामध्ये श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आर्यन सुरेश मोटे हा विद्यार्थी 19 वर्ष खालील वयोगटाखालील 65 किलो वजन गटामध्ये राज्यस्तरीय स्पर्धे मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आर्यन मोटे याचे विशेष हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



