महापौरपदाच्या निवडीपूर्वी सर्वात मोठा ट्विस्ट! ; उद्धव ठाकरेंना जबर धक्का, एवढे नगरसेवक नॉटरिचेबल.

मुंबई : महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. महापालिका निवडणूक निकाल लागल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून महापौर पदासाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात जरी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिकांमध्ये भाजपला देखील स्पष्ट बहुमत मिळवता आलेलं नाहीये. मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये हीच परिस्थिती आहे. स्पष्ट बहुमत नसल्यानं भाजपला देखील आता महापालिकांमध्ये आपला महापौर बसवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अनेक ठिकाणी भाजपला शिवसेना शिंदे गट पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये देखील हीच स्थिती आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आमचे जास्त नगरसेवक निवडून आले म्हणून आम्हीच मोठे भाऊ म्हणत शिवसेना शिंदे गटाकडून या महापालिकेच्या महापौर पदावर दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आमचा स्ट्राईक रेट चांगला असल्यानं आमचाच महापौर होईल असं भाजपनं म्हटलं आहे. हा सर्व गोंधळ सुरू असाताच मोठी बातमी समोर आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles