कोलगांव मध्ये ‘महायुती’ होताच शिंदे सेनेला धक्का! ; कोलगांव शाखाप्रमुख गौरव कुडाळकर यांचा राजीनामा!

सावंतवाडी : कोलगांव जि. प. मतदारसंघात शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कोलगाव शाखाप्रमुख गौरव आनंद कुडाळकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

गौरव कुडाळकर आमदार केसरकर यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि युतीचे चित्र स्पष्ट होताच कुडाळकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ केले आहे.
कुडाळकर यांनी आपला राजीनामा विभाग प्रमुखांकडे सोपवला आहे. पत्रात त्यांनी ‘वैयक्तिक कारणास्तव वेळ देऊ शकत नाही’ असे म्हटले असले तरी, राजकीय वर्तुळात मात्र वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. युती होताच कुडाळकर यांनी घेतलेला हा निर्णय नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार?  आणि यामुळे कोलगावमध्ये शिवसेनेची किती पीछेहाट होणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles