सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील सरपंच सौ. यशश्री सौदागर यांना दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी दिल्ली येथे भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून देशाचे राज्य मंत्री एस पी सिंग बघेला यांच्या हस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन देशातील उत्कृष्ट सरपंच म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच 26 जानेवारी 2026 रोजीच्या कर्तव्यपथ येथील 77 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून सहभागी होण्याची संधी देखील मिळाली. पंचायत राज मंत्रालय ,भारत सरकार यांच्याकडून “पंचम “नावाचे व्हाट्स ॲपवर भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती मिळण्याचे नवीन ॲप लाँच करण्यात आले. त्याची मंत्रालयाच्या अधिकृत पोर्टलवर जाहिरात करण्यासाठी आजगावच्या सरपंच सौ यशश्री सौदागर यांची मुलाखत घेण्यात आली.

दरम्यान भारतातून सर्व राज्यातून ६०० उत्कृष्ट सरपंच निवडले होते. त्यात महाराष्ट्र राज्यातील १६ सरपंचांची निवड करण्यात आली होती. त्यात एक सरपंच म्हणून आजगावच्या सरपंच सौ. सौदागर यांची ही निवड करण्यात आली.
यावेळी भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाचे डेप्युटी सेक्रेटरी श्री ताराचंद्रा IAS अधिकारी यांनी शाल व सन्मान चिन्ह देऊन सौ. सौदागर यांचा गौरव केला.
दरम्यान सरपंच यशश्री सौदागर यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी अभिनंदन केले आहे. तसेच सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.



