माडखोल जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुप्रिया मडगावकरांसह पं. स. उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात! ; विविध देवतांचे आशीर्वाद अन् जनतेच्या साथीने विजयाचा निर्धार!

सावंतवाडी : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा चांगलाच झंझावाती प्रचार सुरू असून, प्रत्येक गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठे आध्यात्मिक व संघटनात्मक बळ मिळाले आहे. सांगेली येथील ग्रामदैवत श्री देव गिरीजानाथ, सावरवाड येथील ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर तसेच वेर्ले गावच्या ग्रामदैवत श्री देवी पावणाई यांच्या चरणी महायुतीच्या उमेदवारांनी श्रद्धेने नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. या पावन प्रसंगी जिल्हा परिषद माडखोल गटाच्या महायुतीच्या उमेदवार सौ. सुप्रिया रवींद्र मडगावकर, पंचायत समिती कलंबिस्त गणाचे उमेदवार श्री रमाकांत रावजी राऊळ तसेच माडखोल पंचायत समितीच्या उमेदवार सौ. अनिता अनिल राऊळ यांच्यासाठी भव्य प्रचार दौरा पार पडला.


या प्रचार कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नेते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विकास, पारदर्शकता व लोकहिताचा कारभार” या ध्येयाने प्रेरित होत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा ठाम संकल्प केला.
गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांमधील जोश आणि ग्रामदैवतांच्या आशीर्वादामुळे महायुतीच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. येणाऱ्या निवडणुकीत माडखोल गट व पंचायत समिती क्षेत्रात महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित होणार, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles