सावंतवाडीत अपक्षांचा ‘विशाल’ धुमाकूळ! ; ‘महायुतीच्या’ परफेक्ट नियोजनाला कोणी लावला सुरुंग?, नगरपरिषद निवडणुकीतनंतर आ. केसरकर यांना होमपीचवर जोरदार धक्का.

  • ✍️ रूपेश पाटील. 
  • सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये बहुतांश जागांवर अपक्ष उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कधी नव्हे असा यशाचा जल्लोष अपक्ष उमेदवारांनी या ठिकाणी साजरा केला.

सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेत अनेक ठिकाणी निष्ठावंतांना डावलल्या गेल्याने महायुतीच्या शक्तीला हा सुरुंग नेमका कोणी लावला? याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान हे सर्व अपक्ष उमेदवार कसे निवडून आलेत?, आणि त्यामागे असलेली ‘अदृश्य शक्ती’ नेमकी कोणाची?, याबाबतही आता नेमक्या ‘किंगमेकर’चा शोध सुरू आहे.

दरम्यान ‘अपक्षांचा राजा कोण?’ हा ही प्रश्न येथील सामान्य जनतेला सतावत आहे. ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’ अशी लढत होणार असे भाकीत अनेक उमेदवारांनी केले होते. मात्र आता चक्क अपक्ष निवडून आल्यामुळे याही चर्चेला एका वेगळ्या दिशेने समजावून घेण्याची गरज वाटत आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत सध्यातरी ‘ह्या अपक्षांचा किंगमेकर नेमका कोण?’ “पूछता हैं सिंधुदुर्ग!” अशीच गत झाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles