इन्सुली येथील रमाईनगरात शिवजयंत्तीनिमित्त शिवरायांना अभिवादन!

सावंतवाडी :  भिमगर्जना युवक मंडळ इन्सुली रमाईनगर यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर, इन्सुली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सुरुवातीला विचार मंचावरील मंडळाचे अध्यक्ष धम्मचारी लोकदर्शी,उपाध्यक्ष कृष्णा जाधव,सचिव अरविंद जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

धम्मचारी लोकदर्शी यांनी शिवरायांना अभिवादन करताना महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे महत्व विषद करुन त्यांनी सर्व अठरा पगडी जातीच्या लोकांना एकत्र करुन राज्य कारभारामध्ये संधी दिली.स्त्रियांचा आदर करण्यावर भर देउन शेतकरी यांच्यासाठी विशेष कल्याणकारी भूमिका घेतल्या.रयतेची पिळवणूक करणारी राज्ये जिंकून त्याठीकाणी स्वराज्याची स्थापना केली,म्हणून अशा प्रकारचे बहुजनांचे छत्रपती राजे पुन्हा होणार नसल्याचे प्रांजळपणे सांगितले.
या कार्यक्रमात सदानंद जाधव,राघोबा जाधव,अजय जाधव, दिपक जाधव,सिध्देश जाधव,मिथील जाधव,तेजस जाधव,सविता जाधव,संजना जाधव,वृषाली जाधव,अनुजा जाधव,स्मिता जाधव,सपना जाधव,स्म्रितिषा जाधव,सुप्रिया जाधव,सानिका जाधव,सृष्टी जाधव,स्वाती जाधव,प्रज्ञा जाधव,कृतिका जाधव,लैला जाधव इत्यादी रमाईनगरातील लोकांची उपस्थिती होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles