सावंतवाडीत भटक्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला! ; मानेचा घेतला चावा, सामाजिक बांधिलकीच्या समीरा खलीलमुळे अनर्थ टळला.

सावंतवाडी : बाहेरचावाडा येथे घराच्या बाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय मुलावर भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने झडप घालून त्याच्या मानेचा चावा घेतला असता तो मुलगा जोरदार किंचाळू लागला हे पाहून समीरा खलील हिने आपल्या जीवाची परवा न करता त्या कुत्र्याच्या तोंडातून त्या मुलाला काढून घेऊन त्याचा जीव वाचवला त्यावेळी त्या मुलाच्या मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता हे पाहून समीरा खलील हिने तत्काळ सदर मुलाला उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.

सदर मुलावर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्याच दरम्यान असं समजलं की सकाळपासून सहा जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला व ते उपचारासाठी रुग्णालयात आले होते.
ही बाब अतिशय गंभीर आहे शासनाने यासंदर्भात लवकरात लवकर पाऊल उचलून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व समीरा खालील यांच्याकडून होत आहे. या प्रसंगी समीर खलील व रवि जाधव यांनी सदर मुलाला उपचारासाठी सहकार्य केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles