कविलकाटे येथील ग्रीन झोन काढा! ; समिल जळवी यांचे कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मौजे कविलकाटे या महसुली गावातील बहुतांश क्षेत्र ग्रीन झोनमध्ये समाविष्ट आहे. सदर ग्रीन झोन रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. समिल प्रभाकर जळवी यांनी कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. विनायक ओंधकर यांना लेखी निवेदन देऊन चर्चा केली. तसेच हा विषय शासन दरबारी लवकरात लवकर पाठपुरावा करून ग्रीन झोन काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कविलकाटे (१ नंबर वॉर्ड) येथील शेतकरी व नागरिकांची प्रमुख मागणी अशी आहे की, “कविलकाटे येथील जमिनीवरील ग्रीन झोन उठवावा.” कविलकाटे या महसुली गावातील सुमारे ६० टक्के जमिनी ग्रीन झोनखाली येतात. सध्याच्या परिस्थितीत हा ग्रीन झोन येथील नागरिकांसाठी गंभीर समस्या ठरत आहे.
ग्रीन झोनमुळे गावातील नागरिकांना घर बांधकाम करणे, घराची दुरुस्ती करणे, घरापर्यंत वीज जोडणी घेणे, बँकेकडून कर्ज मिळवणे तसेच नवीन घरासाठी घर क्रमांक मिळवणे यामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे विविध शासकीय प्रक्रियांमध्ये सहभागी होणे नागरिकांना शक्य होत नाही. परिणामी येथील शेतकरी व नागरिक या ग्रीन झोनमुळे त्रस्त झाले असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते श्री. समिल प्रभाकर जळवी यांनी कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. विनायक ओंधकर यांना लेखी निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles