नॉर्वे : नॉर्वेमधील आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेकडील भागात मे महिन्याच्या मध्यापासून ते जुलैच्या अखेरीसपर्यंत, म्हणजेच सुमारे 76 दिवस सूर्य कधीही मावळत नाही.
निसर्गाचे वेगळे रूप –
76 दिवस सतत प्रकाश असल्याने स्थानिक लोकांचे जीवन आणि पर्यटकांचा अनुभव पूर्णपणे बदलतो. रात्रीच्या वेळीही सूर्य आकाशात दिसत असल्याने पर्यटकांसाठी हे मोठे आकर्षण ठरते.

हिवाळ्यातील स्थिती –
उन्हाळ्यात जसा सतत प्रकाश असतो, तसेच हिवाळ्यात याउलट परिस्थिती असते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात येथे अनेक दिवस सूर्य उगवतच नाही, ज्याला ‘पोलर नाईट्स’ म्हटले जाते.





