सावंतवाडी : श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त व विज्ञान दिनाचे औचित्य साधून नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे तसेच श्री देवी सातेरी ग्रंथालय सांस्कृतिक कला – क्रीडा मंडळ नेमळे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात पाचवी ते सातवी व आठवी ते नववी या दोन गटांत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. लहान व मोठ्या गटात सहा गट करण्यात आले. प्रत्येक गटाला शास्त्रज्ञांचे नाव देण्यात आले. एकूण २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
भूगोल, इतिहास, साहित्यिक, व्याकरण, विज्ञान, गणित, जनरल नॉलेज यावर स्पर्धकांना प्रश्न विचारले.
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर जनरल नाॅलेजची आवड निर्माण व्हावी .भविष्यात हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होतील याच हेतूने नेमळे विद्यालयात प्रश्न मंजूषा स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक उमेश राऊळ यांनी केले.

लहान गटातून – प्रथम गट-हर्षल लिलाधर राऊळ, प्रसाद प्रवीण पडते – द्वितीय गट -अथर्व अर्जुन राऊळ
मोठ्या गटातून – प्रथम गट- सायली संदीप आळवे, लतिका हेमंत मेस्री,
द्वितीय क्रमांक गट- निमिष उमेश राऊळ, रितेश गवंडे या गटाने प्राप्त केला.
गुणलेखक म्हणून नितिन धामापूरकर ,टाईमकिपर म्हणून कीर्ती मयेकर यांनी काम पाहिले.
प्राचार्य आर. के. राठोड, राजेश गुडेकर, अनिल कांबळे, उमेश राऊळ, एम. पी. सारंग, लवू जाधव, आरती कोरगावकर, प्रथमेश करंगुटकर आदी उपस्थित होते.



