स्व. गोविंद विर्नोडकर स्मृती कथाकथन स्पर्धेत स्वरांग गावडे, गार्गी गुंजाळ अव्वल! ; श्रीराम वाचन मंदिराचे आयोजन.

सावंतवाडी : येथील श्रीराम वाचन मंदिरतर्फे आयोजित स्व. गोविंद गणेश विर्नोडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धेत पहिली ते दुसरी गटात स्वरांग प्रसाद गावडे हिने तर तिसरी ते चौथी गटात गार्गी रुपेशकुमार गुंजाळ हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्त्या आणि निवृत्त शिक्षिका कमलताई विर्नोडकर यांनी संस्थेकडे ठेवलेल्या निधीतून त्यांचे वडील गोविंद विर्नोडकर स्मृती कथाकथन स्पर्धोचे आयोजन केले जाते. येथील श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात झालेल्या या स्पर्धोचे उद्घाटन व बक्षीस वितरण संस्थध्यक्ष प्रसाद पावसकर, सचिव रमेश बोंद्रे, सहसचिव बाळासाहेब बोर्डेकर, संचालक राजेश मोंडकर, ग्रंथपाल महेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सहग्रंथपाल रंजना कानसे, महेंद्र सावंत, प्रसाद वाडकर उपस्थित होते.

(सावंतवाडी – विजेत्या स्पर्धकांसह प्रसाद पावसकर, रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर, राजेश मोंडकर, पूनम नाईक, महेंद्र पटेल.)
स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे-

पहिली ते दुसरी गट- प्रथम स्वरांग प्रसाद गावडे, द्वितीय-ओवी प्रसाद आडेलकर, तृतीय-स्वराली विश्वेश पांगम.

तिसरी ते चौथी गट – प्रथम – गार्गी गुंजाळ, द्वितीय – सार्थक घनश्याम वालावलकर, तृतीय-विभा प्रसाद नाईक.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कोलगाव मुक्तद्वार ग्रंथालयाच्या पूनम नाईक यांनी काम पाहिले. त्यांनी स्पर्धा निकाल जाहीर केला. तर आभार राजेश मोंडकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles