सावंतवाडी :पाळणेकोंड धरण हे कोलगाव हद्दीत असून धरणासाठी जमीन ही कोलगाव गावातील गेलेली आहे व शुद्धीकरण केंद्र हे कुणकेरी गावात आहे त्या धरणासाठी कोलगाव तिल अनेक लोक व एक संपूर्ण वाडी विस्थापित झाली शेकडो एकर जमीन कोलगांवतील व कुणकेरी या गावाततील गेली परंतु या धरणाचा फायदा किंचितही कोलगाव व कुणकेरीवासियाना झाला नाही.. कोलगाव व कुणकेरी या गावातील लोकांना आज पाण्यापासून वंचित आहे … आम्ही गेले कित्येक वर्ष सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सहकार्य केले पण परंतु दीपक केसरकर यांनी आम्हाला भूलथापा व खोटी आश्वासने देऊन आमच्या तोंडचे पाणी हिरावून घेतले कोलगाव ग्रामपंचायत बरोबर दिशाभूल करणारे एग्रीमेंट करून आम्हाला पाणी देण्याचे आश्वासन देऊन सुद्धा आम्हाला पाणी देण्यात आले नाही त्यामुळे आता जी पाईपलाईन साठी नवीन लाईन टाकण्यात येत आहे त्यासाठी कोलगाव जमीन जोपर्यंत आमची पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत करू देणार नाही असे एकमुखी ठराव काल झालेल्या मायकल डिसोजा यांच्या नेतृत्वाखाली कोलगाव गावातील सर्व ज्येष्ठ व व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मीटिंग ठरवण्यात आले आले..
त्यासाठी भले आंदोलन करावे लागले तरी आपण करू व ते जिल्हा परिषद सदस्य मायकल
डिसूजा यांच्या नेतृत्वाखाली पुढील दिशा व आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले.



