सावंतवाडी : मोरगाव शाळा क्रमांक १ अंगणवाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या मनोरंजक वेशभूषने करण्यात आली त्यामध्ये त्यांनी महिला सक्षमीकरणाचे संदेश दिले
पालकाने महिला दिन आधारित गाणी गाऊन आणि कविता सादरीकरण करून कार्यक्रमात रंग भरला. पालकांचे विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले त्यामध्ये महिलांनी उत्साहात सहभाग घेतला.
महिलांचे सन्मान कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण –
उपस्थित पालकांचे भेटवस्तू देऊन अंगणवाडीतर्फे सन्मान करण्यात आले महिला वर्गाला महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सेविका सौ. हेमा नाईक व अंगणवाडी मदतनीस सौ. सुप्रिया कदम,अंगणवाडी सनियंत्रण समितीने केले. या कार्यक्रमाला अंगणवाडी पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला त्याबद्दल सर्व पालकांचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.



