सावंतवाडी : जिल्हा परिषद अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे बांदा जिल्हा परिषद मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेले उमेदवार प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दादा साईल यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.



