तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत पडते यांन मातृशोक! ; शालिनी पडते यांचे निधन.

तळवडे : तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष आणि सक्रिय पदाधिकारी वसंत उर्फ प्रशांत गुंडू पडते यांच्या मातोश्री श्रीमती शालिनी गुंडू पडते यांचे आज गुरुवारी सकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या.
शालिनी पडते या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने पडते कुटुंबावर शोककळा पसरली असून, तळवडे परिसरातील व्यापारी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles