अन् रूपाली चाकणकरांचा धमकीचा फोन आला, भोंदूबाबा खरातबाबत नवे धक्कादायक खुलासे! ; ‘त्या’ पत्रकाराच्या दाव्याने खळबळ!

नाशिक : नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक उर्फ कॅप्टन खरात याला अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात याच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. चाकणकरांनी मात्र कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि होणाऱ्या आरोपांबाबत माहित नसल्याचं म्हंटल आहे. एक वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका स्थानिक वृत्तपत्रात, थेट नाव न घेता “कॅप्टन भोंदूबाबा” या मथळ्याखाली वृत्त छापून आले होते.

त्यावेळी मात्र अशोक खरात याने वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रेय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करायला लावते, अशी धमकीच रुपाली चाकणकर यांनी दिल्याचा आरोप खेमनर यांनी केलाय.

महिला आयोगाकडून 'स्यु-मोटो' गुन्हा दाखल करण्यासाठी चाकणकर यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिल्याचा दावाही खेमनर यांनी केला. त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारणामे माहीत नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

महिला आयोगाकडून ‘स्यु-मोटो’ गुन्हा दाखल करण्यासाठी चाकणकर यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिल्याचा दावाही खेमनर यांनी केला. त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारणामे माहीत नव्हते का? असा प्रश्न उपस्थित होतोय. खरातचा दावा आहे की, ते मर्चंट नेव्हीचे निवृत्त अधिकारी आहेत आणि २२ वर्षे त्यांनी अनेक देशांची सफर केली आहे. निवृत्तीनंतर त्यांनी ब्रह्मांडाच्या उत्पत्ती आणि रचनेचा अभ्यास केल्याचा दावा केला आणि ज्योतिष क्षेत्रात सुवर्ण पदक जिंकल्याचे सांगितले. ते स्वतःला ज्योतिष आणि अंकशास्त्राचे तज्ज्ञ म्हणवत होते. खरात ‘शिवनिका ट्रस्ट’चे प्रमुख आहेत आणि ईशानेश्वर मंदिराचे व्यवस्थापनही पाहत होते. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles