अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी ‘कोकण दर्शन डिजिटल मीडिया’चे मुख्य संपादक आनंद धोंड यांची निवड.

सावंतवाडी : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी ‘कोकण दर्शन डिजिटल मीडिया’चे मुख्य संपादक आनंद धोंड यांच्या नावाची घोषणा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित कार्यक्रमात केली.

प्रदेशाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर प्रथमच सावंतवाडीत आगमन झाल्याने राजा माने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य संघटक सिताराम गावडे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक यांसह अन्य उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली.

या घोषणेनुसार, कोकण विभाग अध्यक्षपदी प्रा. रुपेश पाटील, कोकण विभाग संघटक पदी ज्येष्ठ पत्रकार राजेश नाईक, जिल्हाध्यक्षपदी भरत केसरकर, सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी सिद्धेश सावंत यांची निवड जाहीर करण्यात आली.

या नियुक्त्यांमुळे कोकणातील डिजिटल पत्रकारितेला अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles