कणकवलीत आजपासून समर कॅम्पचे आयोजन! ; खेळाडूंना सुवर्णसंधी

कणकवली : उन्हाळी सुट्टीचा योग्य उपयोग करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी युथ स्पोर्ट्स फाऊंडेशन कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी Athletic Association व स्केटिंग असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत भव्य समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅम्पमध्ये अॅथलेटिक्स, स्केटिंग आणि क्रिकेट या लोकप्रिय खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, ५ ते १६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना यामध्ये सहभागाची संधी उपलब्ध आहे.
हे प्रशिक्षण डॉन बॉस्को मैदान येथे पार पडणार आहे. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना मूलभूत कौशल्यांसह प्रगत तंत्राचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

⏰ प्रशिक्षण वेळापत्रक :
🏏 क्रिकेट : सकाळी एक बॅच
🛼 क्रिकेट व स्केटिंग : दुपारी ३.३० ते ५.३०
🏃‍♂️ अॅथलेटिक्स : सायंकाळी ५.०० ते ६.३०

🎯 आवश्यक साहित्य :
क्रिकेट : फुल बाह्यांचा शर्ट, फुल पॅन्ट, बूट, (बॅट असल्यास आणावी) – लेदर बॉल वापरला जाईल
स्केटिंग : स्केट्स, हेल्मेट, नी-गार्ड, एल्बो-गार्ड
अॅथलेटिक्स : बूट, स्पाईक्स इत्यादी
(सर्वांनी पाण्याची बाटली व नॅपकिन आणणे आवश्यक.)
या कॅम्पसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असून, अधिकाधिक खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
📞 संपर्क :
कल्पना तेंडुलकर – 9359596450
बाळकृष्ण कदम – 9167467796

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles