‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेची सिंधुदुर्गात जोरदार भरारी! ; कुडाळ तालुकाध्यक्षपदी देवेंद्र गावडे यांच्या निवडीची घोषणा लई भारी!

कुडाळ : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पकड अधिक भक्कम करण्यासाठी तालुकास्तरावर संघटनात्मक विस्ताराचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, त्याची जोरदार सुरुवात कुडाळ तालुक्यातून झाली आहे. या पार्श्वभूमीवर तरुण, तडफदार आणि धडाकेबाज पत्रकार म्हणून ओळख असलेल्या देवेंद्र गावडे यांची कुडाळ तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड शनिवारी कुडाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
संघटनेला नवचैतन्य देण्याच्या उद्देशाने गावडे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्रित करून संघटना अधिक सक्षम आणि प्रभावी बनेल, असा ठाम विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या निवडीदरम्यान ज्येष्ठ पत्रकार आबा खवणेकर यांनी गावडे यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “गावडे यांची जिद्द, धडाडी आणि पत्रकारितेतील आक्रमक शैली संघटनेला नवी उंची देईल,” असे गौरवोद्गारही यावेळी काढण्यात आले.
या महत्त्वपूर्ण निवड प्रक्रियेस जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. निवड जाहीर होताच गावडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला असून, त्यांच्या नेतृत्वाकडून संघटनेला नवे बळ आणि दिशा मिळेल, अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles