देशात सत्ताधाऱ्यांचेच महिला आरक्षणावर मोर्चे सुरु असताना तीन वर्षापासून जळत असलेल्या मणिपुरात महिलांचा आक्रोश! ; दिवसा रास्ता रोको, रात्री कायदा व सुव्यवस्थेसाठी ‘मशाल’ हाती.

इम्फाळ : याच महिन्यात 7 एप्रिल रोजी मणिपूरमध्ये झालेल्या रॉकेट हल्ल्यात दोन मुले ठार झाली, ज्यामुळे एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. तेव्हापासून पुन्हा आंदोलने सुरू आहेत. या अशांततेच्या पार्श्वभूमीवर 18 एप्रिलपासून संपूर्ण बंद पाळला जात असून, त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. दरम्यान, मीरा पैबी गटातील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. हजारो महिलांचा हा गट केवळ शांततेसाठीच आंदोलन करत नाही, तर लोकांना सामाजिकरित्या जोडण्याचे कामही करत आहे. या महिला दिवसा रस्ते अडवून धरणे धरत आहेत, ज्यामुळे पोलीस किंवा इतर कोणालाही तिथून जाता येत नाही. रात्रीच्या वेळी, त्या मशालींच्या रॅली काढून परिसरात गस्तही घालत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्याच महिला आंदोलनाची चर्चा रंगली असताना या महिलांचा जगू द्या म्हणत तीन वर्षापासून सुरु असलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. गेल्या तीन वर्षांपासून मणिपूर जळत असून वांशिक हिंसाचारात राज्याची सामाजिक घडी रसातळाला गेली आहे.

मोठ्या आंदोलनाची तयारी –

आता सुरू असलेल्या बंदमुळे आर्थिक दबावही वाढत आहे. ख्वैरमबंद इमा मार्केटमधील काही महिला विक्रेत्यांना आपली दुकाने बंद करण्यास भाग पडले आहे. अनिता लॉरेनबाम म्हणाल्या की, याचा अर्थ असा नाही की त्या आंदोलनाच्या विरोधात आहेत. हे काम झाल्यावर त्या त्यात सामील होतील.

  • ‘कोऑर्डिनेटिंग कमिटी ऑन मणिपूर इंटिग्रिटी’ या नागरी समाज संघटनेने 25 एप्रिल रोजी एका मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.
  • ‘मीरा पैबी’ ही चळवळ 46 वर्षांपासून कार्यरत आहे.
  • मद्यपान आणि अमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येशी लढण्यासाठी 1980 च्या दशकात या चळवळीची स्थापना झाली. तेव्हाही मशाल गस्त घालण्यात येत असे.
  • सामुदायिक भावना वाढवणे हा या चळवळीचा उद्देश होता, जेणेकरून लोक समस्या सोडवण्यासाठी एकत्र काम करू शकतील.
  • या चळवळीने मानवाधिकार उल्लंघन आणि AFSPA अंतर्गत होणाऱ्या कारवाईविरोधातही ठाम भूमिका घेतली.
  • इरोम शर्मिला या चळवळीचा सर्वात उल्लेखनीय चेहरा राहिल्या आहेत, ज्यांच्या मोहिमेने मणिपूरकडे जागतिक लक्ष वेधले.
  •  बॉम्ब हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू, सीआरपीएफ छावणीवर हल्ला – दरम्यान, 6 एप्रिल रोजी, मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग त्रोंगलाओबी परिसरात दहशतवाद्यांनी रात्री उशिरा एका घरावर बॉम्ब फेकला. यात 5 वर्षांचा मुलगा आणि 5 महिन्यांची मुलगी ठार झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घरात बॉम्बस्फोट झाला तेव्हा मुले त्यांच्या आईसोबत बेडरूममध्ये झोपली होती. त्यानंतर जमावाने घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या सीआरपीएफ छावणीवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन जण ठार आणि पाच जण जखमी झाले. सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन मणिपूर सरकारने इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यांमध्ये तीन दिवसांसाठी इंटरनेट आणि मोबाईल डेटा सेवा निलंबित केली आहे.
  • तीन वर्षापासून मणिूपर जळत आहे –

    मे 2023 मध्ये मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये वांशिक हिंसाचार भडकला आणि तो 2025 च्या सुरुवातीपर्यंत सुरू राहिला. या हिंसाचारामुळे अनेक भागांमध्ये जाळपोळ, लूटमार आणि हत्यांच्या घटना घडल्या. हजारो लोक विस्थापित झाले आणि त्यांना मदत शिबिरांमध्ये राहण्यास भाग पडले.

  • मुख्यमंत्री बदलूनही परिस्थिती कायम –

    मणिपूरचे तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी राजीनामा दिला. दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांच्यावर वाढता राजकीय दबाव होता. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर, 13 फेब्रुवारी रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यानंतर वाय. खेमचंद सिंह हे नवीन मुख्यमंत्री झाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles