नाणोस ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत महिला सरपंच बिनविरोध! ; जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्याकडून शुभेच्छा, कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण.

सावंतवाडी :  तालुक्यातील नाणोस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजप पुरस्कृत महिला उमेदवार सौ. साक्षी सदानंद शेट्ये यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे गावात तसेच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरपंचपदासाठी इतर कोणताही अर्ज दाखल न झाल्याने सौ. शेट्ये यांची निवड बिनविरोध निश्चित झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
या निवडीबद्दल भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्री. महेश सारंग यांनी नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. “नाणोस ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या नेतृत्वाखाली प्रभावी काम होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पंचायत समिती गटनेते श्री. महेश धुरी, बांदा मंडल अध्यक्ष श्री. मधुकर देसाई, जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. उमेश पेडणेकर, आरोंदा पंचायत समिती सदस्या सौ. नेहा कांबळी, बांदा मंडल सरचिटणीस श्री. नारायण कांबळी, युवा मोर्चा अध्यक्ष सिद्धेश कांबळी, बुथ अध्यक्ष श्री. विनायक शेटये, नाणोस विकास सोसायटीचे चेअरमन श्री. तातो शेट्ये, श्री. शंकर उर्फ दाजी शेटये, अंकित शेट्ये, सानिया शेट्ये, महादेव शेट्ये, सद्गुरु शेट्ये, सदानंद शेट्ये, कृष्णा शेट्ये, काजल शेट्ये, भगवान शेट्ये, संजय कानसे तसेच स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या निवडीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात नवचैतन्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles