मिलाग्रीस हायस्कूलचा दणदणीत निकाल, १००% यशाची परंपरा कायम! ; भार्गवी शेटवे ठरली शाळेत अव्वल, संस्कृत आणि गणितात शंभर पैकी शंभर गुण.

सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी प्रशालेने माध्यमिक शाळांत परीक्षा २०२५-२६ मध्ये शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा यंदाही कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रशालेतून परीक्षेसाठी एकूण १९९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकालामध्ये विशेष प्राविण्य श्रेणीत ११५ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ६७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १५ विद्यार्थी तर पास क्लासमध्ये २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

प्रशालेतील पहिले पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
🥇 भार्गवी अंकुश शेटवे — १००%
(संस्कृत आणि गणित : १००/१००)
🥈 कृष्णा महेश पास्ते — ९९.४०%
(संस्कृत आणि गणित : १००/१००)
🥉 विराज नंदकिशोर राऊळ — ९९%
(गणित : १००/१००)
🏅 जान्हवी विनोद छभैया — ९८.८०%
(विज्ञान : १००/१००)
🏅 राजस केशव मुळीक — ९७.२०%
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles