सावंतवाडी येथील ‘NAB’ नेत्र रुग्णालयाला नेत्र तपासणी वाहन प्रदान. ; २८ मे रोजी भटवाडीत समारंभ.

सावंतवाडी : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) सिंधुदुर्ग, भटवाडी-सावंतवाडी यांच्या वतीने NAB नेत्र रुग्णालयाला नेत्र तपासणी वाहन प्रदान करण्याचा विशेष समारंभ गुरुवार, दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता NAB नेत्र रुग्णालय, भटवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
अमेरिका येथील उदार दातृत्व लाभलेले डॉ. देवदत्त मिशाळ व डॉ. सुरेखा मिशाळ यांच्या विशेष देणगीतून हे नेत्र तपासणी वाहन NAB नेत्र रुग्णालयाला प्राप्त झाले असून, या वाहनाच्या माध्यमातून दुर्गम भागातील गरजू व नेत्ररुग्णांना अधिक प्रभावी सेवा उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमावेळी NAB सिंधुदुर्गच्या लाभार्थी “दृष्टी वाढताना” उपक्रमांतर्गत साड्या व टी-शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. NAB चे सर्व लाभार्थी व संबंधितांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर, सचिव सोमनाथ जिगजीनी आणि खजिनदार डॉ. विनया बाड यांनी केले आहे.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles