सावंतवाडी : सावंतवाडी या ऐतिहासिक संस्थानाचे युवराज लखमराजे सावंतभोंसले यांचा वाढदिवस आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सावंतवाडी सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक तथा अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष प्रा. रुपेश पाटील व सत्यार्थ न्यूजचे व्हिडिओ एडिटर साबाजी परब यांनी युवराजांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट प्रदान करत वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडीच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजघराण्याच्या परंपरेचे जतन करण्यासाठी भोसले घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. वाढदिवसानिमित्त युवराज लखमराजे यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, नागरिकांकडून त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



