वीजपुरवठ्याबाबत नागरिकांनी गैरसमज करू नयेत! ; महावितरणला आम्ही दिल्या आहेत योग्य सेवेसाठी सूचना! : आमदार दीपक केसरक
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर किंवा गैरसमजांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वीज वितरणासंदर्भातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत वीजपुरवठा अधिक सक्षम व अखंडित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना महावितरण प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
सध्या काही भागांमध्ये महावितरणची विविध कामे प्रगतीपथावर असल्याने काही ठिकाणी अल्प प्रमाणात वीजपुरवठ्यात खंड पडत असला तरी ही तांत्रिक बाब असून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना दर्जेदार आणि सुरळीत वीजसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वीज वितरण व्यवस्थेबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्यामुळे येत्या काळात वीजपुरवठा अधिक सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त करत आमदार दीपक केसरकर यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि कोणत्याही प्रकारचे गैरसमज करून न घेण्याचे आवाहन केले आहे.
वीजपुरवठ्याबाबत नागरिकांनी गैरसमज करू नये!, महावितरणला आम्ही दिल्या आहेत योग्य निरंतर सेवेसाठी सूचना! : आमदार दीपक केसरकर यांचे आवाहन
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


