- संदीप चव्हाण.
कुडाळ : फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनात एस एल देसाई विद्यालय पाटची विद्यार्थिनी दिया निलेश सामंत हिने शंभर टक्के गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. दिया निलेश सामंत हिला आधी मराठी विषयात 96 गुण मिळाले होते. पुनर्मूल्यांकनात दोन गुणांची वाढ होऊन 98 गुण मिळाले असून 99.80 टक्क्यांच्या ऐवजी तिला आता 100% टक्के गुण प्राप्त झाले आहेत.
या यशाबद्दल संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत, उपाध्यक्ष गुरुनाथ पाटकर, कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर, सचिव विजय ठाकूर ,राजेश सामंत, दीपक पाटकर ,सुधीर मळेकर, नारायण तळावडेकर ,अवधूत रेगे, महेश ठाकूर, महाबळेश्वर कोचरेकर आणि शरद कोनकर या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे व तिच्या पालकांचे कौतुक व अभिनंदन केले . तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पंचक्रोशीतील ग्रामस्थ ,पालक या सर्व स्तरातून दिया व तिच्या पालकांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


