सन्मान कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारीचा! ; बांदा पोलीस स्टेशनचे प्रभारी PI पंकज शिंदे यांना ‘सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज’ परिवाराकडून शुभेच्छारूपी मानाचा मुजरा!

✍️ साबाजी परब.

सावंतवाडी :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले बांदा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांचे सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सत्यार्थ महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक रूपेश पाटील, व्हिडिओ एडिटर साबाजी परब तसेच कोकण दर्शन डिजिटल मीडियाचे संपादक आनंद धोंड उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. शिंदे यांच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांच्या उल्लेखनीय सेवाकार्याचा गौरव केला.

तब्बल २६ वर्षांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेत पंकज शिंदे यांनी धुळे, जळगाव, नाशिक, सावंतवाडीसह विविध ठिकाणी कार्यरत राहून आपल्या कार्यकौशल्याचा ठसा उमटवला आहे. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, जनसामान्यांशी सुसंवाद आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी यामुळे त्यांनी एक आदर्श पोलीस अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे.
यावेळी बांदा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते. शिंदे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव करत उपस्थितांनी त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा गौरव केला.
“कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि जनसेवा यांचा संगम म्हणजे प्रभारी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे!” अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles