”आरोग्य हाच खरा धनसंचय!” ; सर्वोदयनगर रहिवासी संघाच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी जपत सर्वोदयनगर रहिवासी संघाच्या वतीने गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाव किड्स स्कूल, सर्वोदयनगर येथे पार पडलेल्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्त तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. अनेक नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

 

या शिबिरासाठी “आपला दवाखाना”च्या डॉ. हर्ष सांगावकर, तृप्ती अंधारी, गायत्री वारंग व गंगा सुतार यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिराच्या प्रारंभी सर्वोदयनगर रहिवासी संघाच्या वतीने उपस्थित डॉक्टरांचे रोप भेट देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. हर्ष सांगावकर म्हणाले, “आरोग्य हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती असून त्याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे.” त्यांनी उपस्थितांना निरोगी जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव मेघना राऊळ, खजिनदार विद्याधर तावडे, महिला अध्यक्षा दिशा कामत, शरयू बारदेस्कर, गुंडू साटेलकर, अपेक्षा साटेलकर, योगेश कुलकर्णी, स्मिता कुलकर्णी-दुखंडे, रुद्राक्ष भोसले आणि शितल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच डॉ. विजयालक्ष्मी चिंडक यांनी शिबिराच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावत विशेष मेहनत घेतली. वाव किड्स स्कूलचे संचालक रुजूल पाटणकर यांनी शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संघाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

सर्वोदयनगर रहिवासी संघाच्या वतीने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबविले जात असून, या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी संघाचे कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles