अभिमानास्पद! – विक्रांत सावंत यांची एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर नियुक्ती. ; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या शुभेच्छा!

सावंतवाडी : भाजपचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुभेच्छा देत सहभागाचे पत्र पाठविले आहे.
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.


प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील जन आरोग्य समिती तसेच रुग्णालयांमधील रुग्ण कल्याण समिती यांच्या कामकाजाला अधिक गती देण्याचे उद्दिष्ट या समितीसमोर आहे. आरोग्य, स्वच्छता, पोषण, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
विक्रांत सावंत यांनी या समितीच्या माध्यमातून शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासह सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा मंत्री आबिटकर यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

दरम्यान, सावंत यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्या अनुभवाचा आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles