‘राजस वाढदिवस, हरित संकल्प!’ ; आंबोलीच्या निसर्गरम्य कुशीत आज १००० वृक्षांची लागवड. ;  राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम! : जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांची माहिती.

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आंबोलीच्या हिरव्यागार निसर्गरम्य परिसरात तब्बल १००० विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिली.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत केवळ उत्सव साजरा न करता समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक कार्य करण्याचा संकल्प मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. आंबोलीच्या निसर्गसंपन्न भूमीत उभारला जाणारा हा हरित उपक्रम भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरणार असून, वृक्षलागवडीच्या माध्यमातून निसर्गाशी नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
याशिवाय मतदारसंघातील विविध भागांमध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम राबविण्यात येणार असून, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही ॲड. केसरकर यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles