सावंतवाडीच्या आरोग्यदायी भविष्यास मिळाली नवी दिशा!, बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन! ; सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवेलाही मिळाला सन्मान, अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन मशिनरींचे लोकार्पण! ; विकासकामांच्या मालिकेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा

सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे उत्साहात संपन्न झाले. यामध्ये शहरवासीयांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित मेडिटेशन योगा सेंटरचे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
नगर परिषदेच्या नरेंद्र डोंगर येथील जागेमध्ये साकार होणारे हे योगा सेंटर नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून शहराच्या विकासात एक नवा अध्याय जोडणारे ठरणार आहे.
याच कार्यक्रमात सावंतवाडी शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी व सक्षम करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन कचरा संकलन वाहनांचे तसेच अत्याधुनिक मशिनरींचे लोकार्पणही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामुळे शहर स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे.
दरम्यान, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळालेला हा सन्मान उपस्थितांसाठी भावनिक क्षण ठरला.
या कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत-भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवराज लखमराजे भोसले, मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगांवकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक उदय नाईक, जिल्हा बँक संचालक रवि मडगांवकर, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, दिलीप भालेकर, अभियंता तुषार सरडे, ठेकेदार मेहर पडते यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शहराच्या आरोग्य, स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या सन्मानाचा संगम घडवून आणणारा हा सोहळा सावंतवाडीच्या विकासयात्रेतील एक संस्मरणीय टप्पा ठरला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles