पावसात जनतेच्या मदतीला धावले कुणाल सरमळकर.! ; म्हापणमध्ये मोफत छत्री वाटपाचा उत्स्फूर्त उपक्रम! ; दिवंगत श्रीकांत सरमळकर यांच्या सामाजिक वारशाला पुढे नेत लोकहिताचे उपक्रम, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव.

संदीप चव्हाण.

वेंगुर्ला :  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत बांद्रा शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्या सहकार्याने म्हापण येथे मोफत छत्री वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. शनिवारी शरयू मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगांवकर, वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई, भोगवेचे माजी सरपंच महेश सामंत तसेच शिवसेना म्हापण विभाग प्रमुख देवदत्त साळगांवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना पावसाळ्यात उपयुक्त ठरणाऱ्या दर्जेदार छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कोचरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, सदस्य विशाल वेंगुर्लेकर, प्रगती राऊळ, स्वरा हळदणकर, म्हापण शाखाप्रमुख मंदार चव्हाण, आबा कोचरेकर, कोचरेचे माजी सरपंच सुनील करलकर, पत्रकार आबा खवणेकर, संदीप चव्हाण यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबईत असलो तरी गावाशी नाळ कायम”
उपसभापती सचिन देसाई यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “कुणाल सरमळकर हे सध्या मुंबईत वास्तव्यास असले तरी आपल्या जन्मभूमीबद्दलची आत्मीयता त्यांनी कायम जपली आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकहिताच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचे मोलाचे योगदान असते. गावासाठी काहीतरी देण्याची त्यांची तळमळ कौतुकास्पद आहे.”
यावेळी त्यांनी दीपक केसरकर यांची सिंधूरत्न योजनेच्या उपाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करत, या योजनेमुळे जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाल्याचे नमूद केले.
“श्रीकांत सरमळकरांचा वसा आजही जिवंत”
जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगांवकर यांनी आपल्या भाषणात दिवंगत आमदार श्रीकांत सरमळकर यांच्या सामाजिक वारशाचा उल्लेख करताना सांगितले की, “त्यांच्या विचारांचा आणि लोकसेवेच्या परंपरेचा वारसा कुणाल सरमळकर समर्थपणे पुढे नेत आहेत. लोकांसाठी उपयुक्त उपक्रम सातत्याने राबविण्याची त्यांची भूमिका प्रेरणादायी असून समाजसेवेचा हा प्रवास भविष्यातही असाच सुरू राहावा.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना म्हापण विभाग प्रमुख देवदत्त साळगांवकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आबा कोचरेकर यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles