”बोले तैसा चाले ‘ह्या’ युवा नेत्याची पाऊले!, विक्रांत सावंत शब्दाला जागले!” ; अवघ्या दुसऱ्याच दिवशी शाळेला इन्व्हर्टर भेट!

✍️ रूपेश पाटील. 

सावंतवाडी : “आपल्या शाळेची गरज ओळखून शाळेला आवश्यक क्षमतेचा इन्व्हर्टर पुढील आठ दिवसांत उपलब्ध करून दिला जाईल,” अशी ग्वाही देणारे माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य तथा भाजपा युवा नेते विक्रांत सावंत यांनी आपल्या शब्दाला जागत अवघ्या दुसऱ्याच दिवशी चराठा येथील पी. एम. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला इन्व्हर्टर उपलब्ध करून दिला. त्यामुळे “बोले तैसा चाले…” या उक्तीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या शालेय कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सुविधांबाबत चर्चा झाली होती. शाळेत आधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर होत असला तरी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अध्यापन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याची समस्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी विक्रांत सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

यावेळी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांनी आठ दिवसांत इन्व्हर्टर देण्याची घोषणा केली होती. मात्र केवळ घोषणा न करता आपल्या कृतीतून वचनपूर्ती करत त्यांनी दुसऱ्याच दिवशी शाळेला इन्व्हर्टर सुपूर्द केला. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षण क्षेत्रातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विक्रांत सावंत सातत्याने प्रयत्नशील असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबतीत आपण खंबीरपणे उभे राहू, ही त्यांची भूमिका यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.

शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांनी विक्रांत सावंत यांचे आभार मानत त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले. “दिलेला शब्द पाळणारा लोकप्रतिनिधी” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

“घोषणांपेक्षा कृती महत्त्वाची असते, आणि विक्रांत सावंत यांनी ती कृती करून दाखवली,” अशा प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles