हलत्या चित्ररथांचा कल्पक शिल्पकार हरपला! ; सुरेश आरोलकर यांचे दुःखद निधन.

सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव येथील मारुती मंदिर परिसरात राहणारे, रिक्षा व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करणारे तसेच कलावंत म्हणून परिचित असलेले सुरेश अनंत आरोलकर (वय ६५) यांचे मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सुरेश आरोलकर हे व्यवसायाने रिक्षाचालक असले तरी त्यांची खरी ओळख एक हौशी आणि कल्पक कलाकार अशी होती. सावंतवाडी शहरात गणेशोत्सव काळात विविध मंडळांसाठी आकर्षक आणि देखणे हलते चित्ररथ (देखावे) तयार करण्याची त्यांना विशेष आवड होती. त्यांच्या कलाकृतींनी अनेकदा नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता.
ते कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी होते. साधा, मनमिळावू आणि सर्वांशी जिव्हाळ्याने वागणारा स्वभाव असल्याने त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या अकाली जाण्याने अनेकांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
त्यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा सावंतवाडी येथील उपरळकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मोठे बंधू श्रीकृष्ण उर्फ बाबी आरोलकर, धाकटे बंधू सुनील आरोलकर, बहीण, पुतणे तसेच अन्य आप्तस्वकीय असा परिवार आहे.
सुरेश आरोलकर यांच्या निधनाने एक संवेदनशील कलाकार, मेहनती रिक्षाचालक आणि सर्वांचा लाडका मित्र काळाच्या पडद्याआड गेला असून, त्यांच्या आठवणी कायमच जिवंत राहतील. अशी माहिती राजू मसुरकर यांनी दिली.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles