एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ‘हा’ मोठा डाव! ; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

नवी दिल्ली : सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरलेलं प्रकरण म्हणजे ‘ऑपरेशन टायगर’. शिवसेना (उबाठा) पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. रविवारी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन सहभागी झाले होते, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक खासदार दिल्लीला पोहोचल्याने राजकारण तापलं आहे.

दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे सेनेतील बंड करणारे 6 खासदार दिल्लीला पोहोचले असून त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी वेळ घेतली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी ठाकरे गटातील बंडखोरांच्या भेटीआधीच अरविंद सावंत यांनी अध्यक्षांना पत्र दिल्याचंही सुत्रांनी कळवलं आहे. या पत्रामध्ये अनेक बाबींच्या नोंदी केल्या गेल्या आहेत.

सदर पत्रात ठाकरे सेनेतील अरविंद सावंत यांनी बंडखोरांना गट स्थापना तसेच विलनीकरणास मान्यता न देण्याची मागणी केली आहे, इतकेच नाही तर कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं असंही सांगितलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles