माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांना ‘कोकण समाजभूषण’ पुरस्कार जाहीर! ; अन्यायाविरुद्ध लढा, सामाजिक बांधिलकी, कायद्याचा प्रभावी वापर आणि आपत्कालीन बचावकार्याची दखल, ९ ऑगस्टला होणार सन्मान!

सावंतवाडी : माहितीच्या अधिकाराचा प्रभावी वापर करत अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले माहिती अधिकार पदाधिकारी तथा माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्याचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुशिल रूपाजी चौगुले यांच्या सामाजिक व जनहिताच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘कोकण समाजभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

सामान्य नागरिकांच्या हक्कांना बळ देणाऱ्या माहितीच्या अधिकार कायद्याचा प्रभावी आणि सनदशीर वापर करून अनेक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी चौगुले यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून प्रश्नांना भिडणे, प्रशासनाकडून उत्तरदायित्व निश्चित करून घेणे आणि सामान्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे, या कार्यपद्धतीमुळे त्यांनी सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये अन्यायाला सामोरे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठीही चौगुले यांनी सातत्याने योगदान दिले आहे. विविध प्रकरणांमध्ये कायदेशीर मार्गाने शासन दरबारी पाठपुरावा करून संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत कायद्याच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारण्याचे काम त्यांनी केले आहे.

केवळ माहिती अधिकार क्षेत्रापुरते मर्यादित न राहता चौगुले यांनी आपत्कालीन परिस्थितीतील बचावकार्यातही सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या धाडसी आणि सेवाभावी कार्याची शासनानेही दखल घेत त्यांना शौर्य पुरस्काराने गौरविले आहे.

सामाजिक न्यायासाठी कायद्याची ताकद सामान्यांच्या हातात पोहोचविण्याचे कार्य, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आपत्कालीन परिस्थितीत केलेले धाडसी कार्य या सर्व योगदानाचा गौरव म्हणून सुशिल चौगुले यांची ‘कोकण समाजरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

९ ऑगस्टचा हा सन्मान सोहळा त्यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली कौतुकाची थाप ठरणार असून, माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून जनहितासाठी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला या पुरस्कारामुळे नवी ऊर्जा मिळणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles