लग्न सुप्रिया सुळेंच्या कन्येचं, चर्चा मात्र ‘ह्या’ काश्मिरी मुलीची. ; कोण आहेत कायनात धार?

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह आज सारंग लखानी यांच्याशी मुंबईत पार पडला. या विवाहसोहळ्याला राज्यासह देशातील अनेक मान्यवर नेते हजर होते. पवार कुटुंबातील सर्वच सदस्य या सोहळ्याला हजरे होते. पार्थ पवार, जय पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवार आणि राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली. या विवाहसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत. यात कायनात धार यांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.

कायनात धार यांच्या नावाची चर्चा…

रेवती सुळे यांच्या लग्नात कायनात धार यांच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या. कायनात धार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासह प्रवेश केला. याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे कायनात धार कोण आहेत? अशी चर्चा सुरू झाली आहे. याआधीही त्यांचे नाव चर्चेत आले होते.

कोण आहेत कायनात धार?

समोर आलेल्या माहितीनुसार कायनात धार या काश्मीरमधील रहिवासी आहेत. मात्र राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांच्यासोबत त्या अनेक सार्वजनिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसल्या आहेत. काही दिवसांपासून कायनात धार यांनी पार्थ पवार यांच्यासोबत मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात दर्शन घेतले होते. पवार कुटुंबासोबत त्यांचे जवळचे  संबंध आहेत. कारण त्या विविध कार्यक्रमांमध्ये नेहमी हजर असतात. मात्र, कायनात धार आणि पवार कुटुंब यांच्यातील नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अनेक दिग्गज नेत्यांची हजेरी –

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्याला शरद पवार, देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत, राज ठाकरे, भगवंत मान, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राहुल गांधी, वर्षा गायकवाड, डीएमकेच्या खासदार कनिमोझी, रोहित पवार, ओमर अब्दुल्ला, फारुक अब्दुल्ला, शायना एनसी, खासदार डी राजा, दिग्विजय सिंग, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे, निशिकांत दुबे, जय पवार, धीरज देशमुख, बासुरी स्वराज, अमोल कोल्हे, पूर्वा वळसे पाटील, अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles