वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली अन् केलं लंका दहन, २० वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत! ; भारत ‘अ’ संघाने श्रीलंका ‘अ’ संघाला ६६ धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली.

दांबुला : भारत ‘अ’ संघाने श्रीलंका ‘अ’ संघाला 66 वांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली. दांबुला येथे प्रथम फलंदाजी करताना भारत ‘अ’ संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून ३७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंका ‘अ’ संघ 47.1षटकांत 311 धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या विजयाचा नायक 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी होता. त्याने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 11 षटकार आणि 6 चौकारांसह 94 धावा ठोकल्या. वैभवने अवघ्या 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करून 50 षटकांच्या क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम प्रस्थापित केला. कर्णधार तिलक वर्माने 67, प्रियांश आर्याने 39 आणि अनुकूल रॉयने 15 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या.

श्रीलंकेची बॅटिंग –

श्रीलंकेची विजयी धावांचा पाठलाग करताना काही खास सुरुवात राहिली नाही. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. भारताने श्रीलंकेला 17 बॉलआधीच ऑलआऊट केलं. भारताने श्रीलंकेला 47.1 ओव्हरमध्ये 311 रन्सवर ऑलआऊट केलं.

श्रीलंकेसाठी वानुजा साहन याने सर्वाधिक 62 धावा केल्या. सदीरा समरविक्रमा याने 52 धावांचं योगदान दिलं. विजयकांत याने 39 आणि कॅप्टन सहान अरचिगे याने 38 धावा केल्या. श्रीलंकेच्या या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना श्रीलंकेला विजयी करता आलं नाही. भारतासाठी यश ठाकुर आणि विपराज निगम या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. अनुकूल रॉय याने दोघांना बाद केलं. तर अशोक शर्मा आणि तिलक वर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवत श्रीलंकेचं पॅकअप करण्यात योगदान दिलं.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles