नेमळे येथे भरधाव थारचा भीषण अपघात! ; झेवियर फर्नांडिस व ग्रामस्थांची तत्पर मदत.

सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे येथील एरंडोकवाडी परिसरात आज दुपारी सुमारे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील थार कारचा भीषण अपघात होऊन एकच खळबळ उडाली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, आलिशान थार वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीए-०३-एएम-८४७८ क्रमांकाची थार कार नेमळे मार्गावरून जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. वाहनाचा वेग अतिशय जास्त असल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन जोरदार धडकली. अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सदर वाहनाचे मालक सनी नानोडकर (बारदेश, गोवा) असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात काही जण जखमी झाल्याचे समजत असून त्यांना तातडीने मदत करून उपचारासाठी रवाना करण्यात आले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना वाहनातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार मिळू शकले.

या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा भरधाव वाहनचालकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, वेगावर नियंत्रण नसल्यास क्षणात होत्याचे नव्हते होऊ शकते, याची जाणीव या अपघाताने करून दिली आहे. घटनेची अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू असून, स्थानिकांकडून या अपघाताची चर्चा सुरू आहे.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles