सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक विहीर गाळमुक्त! – राजू मसुरकर यांच्या पाठपुराव्याला यश.

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारी सिद्धीवाडा परिसरातील नगरपालिका मालकीची सार्वजनिक विहीर गाळमुक्त करून स्वच्छ करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना स्वच्छ व निर्जंतुक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली.

उपजिल्हा रुग्णालयाजवळील ही सार्वजनिक विहीर गेल्या अनेक वर्षांपासून गाळाने भरली होती. मसूरकर यांच्या पाठपुराव्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेने विहिरीचा गाळ उपसून स्वच्छतेचे काम पूर्ण केले. यापूर्वी रुग्णालयात पाण्याचा अपुरा पुरवठा होत असल्याने रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय होत होती. ही समस्या दूर करण्यासाठी काही वर्षांपूर्वी विहिरीवर पंप बसवून पाइपलाइनद्वारे रुग्णालयात पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता.

विहिरीची नियमित स्वच्छता आणि गाळ उपसा केल्यास पाण्याची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. अशुद्ध पाण्यामुळे टायफॉइड, कावीळ, अतिसार आदी आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा जलस्रोतांची नियमित देखभाल होणे आवश्यक असल्याचे मसूरकर यांनी सांगितले.

या कामासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर, आरोग्य निरीक्षक विनोद सावंत, दीपक म्हापसेकर तसेच मुख्याधिकारी यांनी सहकार्य केल्याबद्दल मसूरकर यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles