११०० पाहुणे, वेडिंग व्हेन्यूचं एका दिवसाचं भाडं ९ कोटी! ; लग्नाचं बजेट १९० कोटी, या पॉप स्टारचा शाही विवाह चर्चेत.

मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय पॉप स्टार टेलर स्विफ्ट केवळ आपल्या गाण्यांमुळेच प्रसिद्ध नाहीये, तर रेकॉर्ड तोड कमाईमुळेही ती लोकप्रिय आहे. सुपरहिट कॉन्सर्ट्स आणि कोट्यवधी चाहत्यांमुळेही टेलर स्विफ्ट नेहमी चर्चेत राहते. आता तिचं लग्न म्हटल्यावर हा सोहळा एखाद्या बड्या शो पेक्षा कमी असणार नाहीये.

रिपोर्ट्सनुसार, उद्या 3 जुलै रोजी ट्रेविल्स केल्स सोबत तिचं लग्न होत आहे. हे लग्न जगातील सर्वाधिक चर्चेत असणारा शाही विवाह सोहळा म्हणून गणला जात आहे. या लग्न सोहळ्याला 1100 हून अधिक पाहुणे येणार आहे. या लग्नासाठी थोडथोडकं नव्हे तर तब्बल 190 कोटीचं बजेट ठेवण्यात आला आहे. आता ज्या गायिकेची नेटवर्थच 2 बिलियन डॉलर आहे, तिच्यासाठी हा खर्च म्हणजे किरकोळच आहे.

टेलर स्विफ्टचं लग्न शाही थाटात होणार आहे. या लग्नाचं बजेट अवाढव्य आहे. त्यामुळे हे लग्न अधिकच चर्चेत आलं आहे. एका अंदाजानुसार या लग्नाचा एकूण खर्च 10 ते 20 मिलियन डॉलर म्हणजे 95 कोटी पासून 190 कोटी इतका आहे. विशेष गोष्ट म्हणजे केवळ मेडिसन स्क्वेअर गार्डन काही दिवसासाठी तयार करण्याकरिता आणि त्याचा वापर करण्यासाठी 3 मिलियन डॉलर म्हणजे 28 कोटी रुपये खर्च होणार आहेत. मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्नस्थळाचं एका दिवसाचं भाडं 1 मिलियन डॉलर एवढं आहे. म्हणजे दिवसाला 9 कोटी रुपये इतकं हे भाडं आहे.

हे लग्न पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येत आहे. त्यामुळेच पाहुण्यांना पारंपारिक लग्नपत्रिका देण्याऐवजी डीजिटल आमंत्रण दिलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, सुमारे 1100 ते 1200 पाहुण्यांना या लग्नाला बोलावण्यात आलं आहे. इतकंच नाही तर लग्नपत्रिकेसोबत NDA- Non-Disclosure Agreement सुद्धा पाठवण्यात आलं आहे. कारण लग्नाशी संबंधित माहिती बाहेर जाऊ नये.

पाहुणे कोण येणार?

या लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची यादीही तयार आहे. या यादीत असंख्य बड्या लोकांचा समावेश आहे. यात एड शीरन, चेरी सीबॉर्न, जो क्राविट्ज, सुकी वॉटरहाउस, बेन्सन बून आणि हाइम कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे. त्यामुळेच जगाचं लक्ष या विवाहाकडे लागलं आहे.

रस्ते बंद होणार?

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मॅनहट्टन येथील रस्ते तात्पुरते बंद करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. तर मेडिसन स्क्वायर गार्डनचं संपूर्ण शेड्यूल आधिच ब्लॉक करण्यात आलं आहे. एका रिपोर्ट्सनुसार, पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी हायएंड प्रायव्हेट सेक्युरिटी, अतिरिक्त स्टाफ आणि इतर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. लग्न सोहळ्या दरम्यान काही खास म्युझिक परफॉर्मन्स आयोजित केला जाऊ शकतो. त्यामुळेच त्यांच्या टीमचे काही सदस्य अमेरिकेच्या प्रसिद्ध प्रॉडक्शन कॅम्पस रॉक लिटिट्समध्ये दिसले. या ठिकाणी जगातील सर्वात मोठे म्युझिक कॉन्सर्ट्ससाठी स्टेज आणि सेट तयार करण्यात येतो. हा विवाह सोहळा पारंपारिक लग्नापेक्षा एका भव्य म्युझिक इव्हेंट सारखा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles