शिष्यवृत्तीच्या गुणवंत यादीत नेमळे विद्यालयाचा झेंडा फडकला! ; चार विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी, जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत मानाचे स्थान.

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) मध्ये नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रभावी छाप उमटवली आहे. विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत मानाचे स्थान पटकावत यशाचा चौकार लगावला असून संपूर्ण नेमळे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परीक्षेत लौकिक घनश्याम आळवे याने ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० वा, तर तालुक्यात ५ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. वेदिका जयंत वजराटकर हिने जिल्ह्यात ३१ वा व तालुक्यात ६ वा क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली. पूर्वा नरेश परब हिने जिल्ह्यात ६४ वा, तर तालुक्यात १२ वा क्रमांक पटकावला. तसेच रितेश कृष्णकांत गवंडे याने ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तालुक्यात १५ वा क्रमांक मिळवून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा खोवला.

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा वह्या, पेन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य आर. के. राठोड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थ्यांच्या यशामागे उमेश राऊळ, एम. पी. सारंग, नितीन धामापूरकर, लवू जाधव, नेत्रा चव्हाण, क्रांती मयेकर आणि नूतन कडावलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांसह शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनामुळे नेमळे विद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रातील आपली उज्ज्वल परंपरा कायम राखत गुणवत्तेचा नवा मानदंड निर्माण केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles