आठ दिवस उजेड, उरलेला महिना अंधार! ; वाढीव वीजबिलामुळे नेमळेकरांचा संताप अनावर.

सावंतवाडी: तालुक्यातील नेमळेत एका महिन्यात आठच दिवस लाईट पेटते , वीज बिल मात्र महिनाभराचे..
नेमळे कामळेवीर परिसरामध्ये मे महिन्यापासून आज पर्यंत कोणतीही नैसर्गिक अडचण नसतानाही वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे यामुळे विज ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया दिसून येत आहेत स्थानिक पातळीवरील वीज कर्मचारी आपल्या परीने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बेजबाबदार आणि अनियोजित कारभारामुळे वीज ग्राहकांना निष्कारण त्रास सहन करावा लागत आहे गेल्या दोन महिन्याचा सरासरी हिशोब केल्यास प्रत्येक एका महिन्यात आठच दिवस प्रत्येक वीज ग्राहकांच्या घरात लाईट पेटली वीज बिल मात्र महिनाभराच भरून घेतलं जात त्याच प्रमाणे जुने मिटर बदलून नवीन स्मार्ट मिटर बसविण्यासाठी जुन्या मिटर रिडींग चा फोटो न घेता ऑफिस मधून नच अंदाजाने वाढीव रिडिंग वापरून अव्वाच्या सव्वा बिल आकारले जाते या वाडीव बिला संदर्भात अधिकाऱ्यांना विचारले असता तुमचा मिटर नादुरुस्त आहे स्मार्ट मिटर बसवून घ्या म्हणजे बिल कमी येईल. अशी खोटी बनवाबनवी करून जबरदस्तीने वीज ग्राहकाला स्मार्ट मिटर बसविण्यास भाग पाडले जाते तसेच वाढीव वीज बिलही दर महिन्याच्या महिना वेळेत भरून घेतले जाते नाहीतर वीज कनेक्शन कट केले जाते.लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधीकारी यांनी या समस्येकडे पूर्ण पणे दुर्लक्ष केल्या चा आरोप वीज ग्राहक करत आहेत.महावितरण ने तातडीने नेमळे गावातील वीज पुरवठा सुरळीत न केल्यास थेट कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा नेमळे ग्रामस्थानी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles