जिल्ह्यात अव्वल ठरली सावंतवाडी नं. २ पीएम श्री शाळा! ; इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक यश. ; तब्बल १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक, आराध्य आपटे राज्यात ९ वा तर जिल्ह्यात प्रथम!

सावंतवाडी : कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर, जि. प. पूर्ण प्राथमिक पीएम श्री शाळा, सावंतवाडी नं. २ ने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा ऐतिहासिक कामगिरी करत पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. या परीक्षेत तब्बल १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, जिल्ह्यात सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक घडविणारी ही पहिली शाळा ठरली आहे.
या उल्लेखनीय यशामध्ये कु. आराध्य अमोल आपटे याने राज्यात ९ वा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळवत शाळेच्या यशात मोलाचा वाटा उचलला. विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि नियोजनबद्ध मार्गदर्शन असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेत आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles