भाजपच्या माध्यमातून युवा नेते विशाल परब यांची ‘ज्ञानक्रांती’! ; तळवडे येथे भाजपकडून विद्यार्थ्यांच्या हातात उज्ज्वल भविष्यातील शिदोरी! ; शिक्षणसेवेचा आदर्श उपक्रम.

सावंतवाडी : राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणाची ठोस प्रचिती देत भाजप युवा नेते विशाल परब यांनी तळवडे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत ज्ञानसेवेचा प्रेरणादायी उपक्रम राबविला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्याची शिदोरी देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपने विकासाची नवी दिशा दिली. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक १, २ व ४ तसेच श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे आणि उपसभापती गौरव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाप्रती असलेली जबाबदारी असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपत अशा लोकहिताच्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुढेही सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे आणि उपसभापती गौरव मुळीक यांनी तळवडे जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे जिल्हा परिषद शाळा अधिक सक्षम आणि आदर्श बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तथा माजी सभापती पंकज पेडणेकर, दादा परब, बाळू साळगावकर, शंकर सावंत, केतन आजगावकर, धीरेंद्र मापसेकर, सिद्धीश तेंडोलकर, ज्ञानेश्वर गोडकर, रवींद्र परब, सुशांत गावडे, संदीप परब, शाम शेतकर, सचिन परब, वासुदेव जाधव, प्रवीण लोके आणि विकास गावडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत विशाल परब यांच्या पुढाकारामुळे शिक्षण क्षेत्रात समाजाभिमुख कार्याची प्रभावी सुरुवात झाल्याची भावना व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles