जनसेवा निधी बांदातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव! ; खेमराज बांदाच्या २२ विद्यार्थ्यांचे संस्कृतमध्ये घवघवीत यश!

बांदा : जनसेवा निधी बांदा या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शालांत परीक्षेत लक्षणीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज रोख परितोषिके देऊन गौरविण्यात आले. गणित, विज्ञान, संस्कृत, मराठी, हिंदी विषयात विशेष प्राविण्य मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
खेमराज बांदाच्या सभागृहात जनसेवा निधी बांदा या संस्थेतर्फे दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी जनसेवा निधी बांदा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मिलिंद खानोलकर, उपाध्यक्ष हेमंत खानोलकर, भरत गावडे, खेमराज प्रशालेचे मुख्याध्यापक प्रमोद सावंत, जनसेवा निधी संस्थेचे सचिव गुरुनाथ नार्वेकर आदी उपस्थित होते.

यावेळी दहावी परीक्षेत संस्कृत विषयात खेमराज बांदाच्या तब्बल २२ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले.या विषयांचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका शामल सावंत यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवणारे कु. अथर्व जय भोसले,रिया दीपक देसाई,सेवा सचिन देसाई,अनुष्का पंकज पावसकर,धारा सुशांत ठाकूर,आर्यन महादेव नागवेकर,रिद्धी संतोष तावडे,निखिल भिवाजी देसाई,ईश्वरी संतोष वावळीये,अदिती दत्तप्रसाद मेस्त्री,नित्या अजय महाजन,शिवा संदेश सावंत,मानसी रत्नकांत चव्हाण,तनिष्का प्रशांत चिंदरकर,युतिका हरेश मळगावकर,सारा शाहिद शेख,ऋतुजा जयवंत पावसकर,स्वामी राजेश पावसकर,अंतरा प्रवीण मेस्त्री,रितेश राजेंद्र सावंत,श्रुती रविशंकर कुडव,आर्या अंकुश ठाकुर यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
तसेच दहावी परीक्षेत बांदा विभागातून प्रथम आलेल्या कु.दुर्वा मुनेश वारंग,मडूरा हायस्कुलमधून प्रथम आलेली ख़ुशी मंगेश पेडणेकर,कुडासे हायस्कुलमधून प्रथम आलेली पूर्वा प्रमोद कुडासकर,समाजशास्त्र विषयात प्रथम क्रमांक प्राप्त दुर्वा मुनेश वारंग,विज्ञान विषयात प्रथम सुयश गावकर,गणित विषयात प्रथम साक्षी गवंडी,अनुष्का मेस्त्री,मराठी विषयात प्रथम ईश्वरी वावळीये,इंग्रजी विषयात प्रथम निखिल देसाई यांचा रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
यावेळो खेमराजचे मुख्याध्यापक प्रमोद सावंत, शिक्षिका शामल सावंत, पालक प्रतिनिधी जय भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. तर आभार हेमंत खानोलकर यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles